Ad will apear here
Next
बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन

आज दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन.
जन्म. १७ जुलै १९३० नाशिक येथे.
बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे. ‘वेदाआधी तू होतास...वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास...तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही...’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं. त्यांच्या १९६२ सालच्या ‘जेव्हा मी जात चोरली’ या स्वानुभवावर आधारित पुस्तकानं त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. पाठोपाठ त्यांचा ‘आकार’ हा कवितासंग्रहही गाजला. ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘सूड’, ‘अघोरी’, ‘दलित साहित्य आजचे मानवी विज्ञान’, ‘वेदांआधी तू होतास’, ‘कोंडी’ही त्यांची गाजलेली पुस्तकं. त्यांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या पुस्तकाला ‘हरी नारायण आपटे पुरस्कार’ मिळाला असून, ते पुस्तक दलित साहित्यातला मैलाचा दगड समजलं जातं.

बागुल यांना २००७ सालचा ‘जनस्थान’ पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या स्मरणार्थ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे नवीन लेखकांना पुरस्कार देण्यात येतो. बाबूराव बागुल यांचे २६ मार्च २००८ रोजी निधन झाले.

संजीव_वेलणकर
बाबुराव बागुल यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5354141904926633827



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GSOKDA
Similar Posts
रणजितसिंग यांचा स्मृतिदिन आज एका शूर, मुत्सद्दी, युद्धशास्त्रज्ञ, पराक्रमी, शिकारी रणजितसिंग यांचा स्मृतिदिन. जन्म. १३ नोव्हेंबर १७८० पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात. रणजितसिंग यांचा जन्म संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी झाला. रणजितसिंग' यांचा एकंदर जीवनकाल ५९ वर्षांचा. वडिल
संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा जन्मदिन जन्म. १२ मे १९३० औरंगाबाद येथे आज इक्बाल कुरेशी म्हटले, की सर्वप्रथम आठवतो तो १९६४चा चित्रपट ‘चा चा चा!’ अभिनेता चंद्रशेखर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक होता.
आज संत नामदेव यांची पुण्यतिथी जन्म. २६ ऑक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते.
गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन आज आज नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन. जन्म. १९ मे १९३८ माथेरान येथे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language